Contact Banner

जळगाव येथे अखिल भारतीय लेवाटीदार महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार

 

Important-meeting-of-All-India-Levatidar-Federation-held-in-Jalgaon;-Determination-to-implement-social-initiatives


जळगाव येथे अखिल भारतीय लेवाटीदार महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार


लेवाजगत न्यूज  सावदा  दि. १९ जुलै –  जळगांव येथे अखिल भारतीय लेवाटीदार महासंघ (ग्रामीण व शहर शाखा, जळगाव) यांची कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे यांच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत स्थानिक कार्यकारिणी गठीत करणे तसेच गावागावात सामाजिक उपक्रम राबवणे या महत्त्वपूर्ण बाबींवर निर्णय घेण्यात आले.





सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी सौ. शीतल शांताराम पाटील (शेळगाव) लिखित “चाहाय” व डॉ. अरविंद नारखेडे लिखित “काय गतका फुटलाय…!” या पुस्तकांच्या प्रती श्री अरुण बोरोले यांना भेट देण्यात आल्या व त्यांचा सन्मान करण्यात आला.


बैठकीस महासंघाचे पदाधिकारी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थिती हेमचंद महाजन,  घनश्याम चौधरी सर,  गिरीश भोळे,  सुनिता चौधरी, श्रीमती साधना लोखंडे, नीता वराडे, चारुलता पाटील, पुष्पा पाटील,  शरद भीरुड,  किशोर भोळे,  प्रकाश वराडे,  अरुण अत्तरदे,  दीपक चौधरी,  अरविंद नारखेडे,  अनिल महाजन,  लीलाधर नारखेडे,  उमाकांत जावळे आदींचा समाज बांधव यांचा समावेश होता.


बैठकीचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन  प्रा महेंद्र पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.