स्व.मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम – ६०० रोपांचे लागवड उद्दिष्ट
धनाजी नाना महाविद्यालयात मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभ
स्व.मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम – ६०० रोपांचे लागवड उद्दिष्ट
लेवाजगत न्यूज फैजपूर, ता. ८ जुलै (प्रतिनिधी) –तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माजी लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या १५व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दिनांक ८ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणार असून परिसरात ६०० देशी प्रजातींच्या रोपांची लागवड केली जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ हे असतील, तर उद्घाटन कुलगुरू मा. श्री व्ही. एल. माहेश्वरी (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेंद्र नन्नवरे (मा. राज्यपाल नियुक्त सदस्य),श्री सचिन नांद्रे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग),प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी (उपाध्यक्ष),श्री मिलिंद वाघुळदे,श्री लीलाधर चौधरी,प्रा. किशोर चौधरी,प्रा. मुरलीधर फिरके,प्रा. नंदकुमार भंगाळे,प्रा. मधुकर पाटील,श्री ओंकार सराफ,श्री संजय चौधरी,डॉ. शशिकांत पाटील,श्री हरीश वसंतदाणी,प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे,डॉ. राजेश चौधरी,डॉ. रवींद्र चौधरी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हिरवा सातपुडा अभियानाचा पुढचा टप्पा
स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी सुरू केलेल्या हिरवा सातपुडा अभियानाची ही पुढील प्रेरणादायी पायरी असून, देशी व औषधी वनस्पतींचे संवर्धन ही त्यांची दूरदृष्टी होती. याच हेतूनं मियावाकी तंत्रज्ञानावर आधारित घनवन प्रकल्प राबवला जाणार आहे.
हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक यांचेही यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.
याआधी अशा प्रकल्पांमुळे परिसरात तापमानात लक्षणीय घट झाली असल्याने याचा थेट फायदा परिसरातील नागरिकांना मिळतो. त्यामुळे या उपक्रमास सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
लागवड होणाऱ्या प्रमुख देशी वृक्षांची यादी:
- निंब, पापडी, चिंच, रामफळ, सिताफळ, अमलतास,
- मोह, बेल, शिसू, अर्जुन, बेहडा, इलायची,
- खेळणी,अशोका, आंबा, कांचन
(एकूण ६०० रोपे)
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे यांच्या पुढाकारातून नियोजन सुरू असून, अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी व सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या उपक्रमासाठी समर्पितपणे कार्यरत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत