Contact Banner

कासोदा पोलीसांची पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापामार कारवाई;

Kasoda police raids gambling den; five arrested


कासोदा पोलीसांची पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापामार कारवाई; पाच जण अटकेत, 1.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

लेवा जगत न्यूज कासोदा (ता. एरंडोल) : कासोदा शहरातील साईबाबा मंदिराजवळ भवानी नगर परिसरातील एका शेतात लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलीस स्टेशनच्या पथकाने अचानक छापा टाकून पाच जणांना अटक केली. ही कारवाई दिनांक २३ जुलै २०२५ रोजी प्रभारी अधिकारी श्री. निलेश राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

घटनास्थळ शहरापासून लांब आणि आडवाटेवर असल्याने पोलिसांनी धोका पत्करत अंदाजे एक ते दीड किलोमीटरचे अंतर पायी चालत पार करत छापा टाकला. पोलीसांची चाहूल लागताच जुगारी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोहेका नरेंद्र गजरे, पोना प्रदीप पाटील, पोकॉ समाधान तोंडे, पोकॉ निलेश गायकवाड, पोकॉ दीपक देसले आणि पोकॉ कुणाल देवरे यांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने त्यांना पकडले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – ईश्वर सुकलाल महाजन, अक्षय राजेंद्र शिंपी, प्रविण आत्माराम पाटील, कैलास निंबा चौधरी आणि गणेश प्रकाश मराठे. त्यांच्या विरोधात कासोदा पोलीस स्टेशन येथे C.C.T.N.S. क्र. 111/2025 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी 13,750/- रुपये रोख रक्कम आणि 1,30,000/- रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकली, असा एकूण 1,43,750/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका राकेश खोंडे हे करत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी अधिकारी सपोनि निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कासोदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारचे अवैध जुगार व इतर गैरकृत्ये थांबवण्यासाठी धाडसत्र सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(लेवा जगत न्यूज – तुमच्या परिसरातील सत्य, थेट तुमच्यापर्यंत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.