शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार अमोल जावळे विधानसभेत आक्रमक
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार अमोल जावळे विधानसभेत आक्रमक
प्रतिनिधी | लेवाजगत न्यूज, रावेर
तारीख : ३ जुलै २०२५-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अत्यंत गंभीर व ठोस मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडत सरकारला जाब विचारला.
सभागृहात बोलताना आमदार जावळे म्हणाले,
"शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका सरकारची असली तरी कृषी विभागाच्या पत्रव्यवहारात मोठ्या प्रमाणात दिरंगाई होते. यामुळे नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते."
जून-जुलै २०२३ मध्ये आलेल्या वादळात मोठे नुकसान
या वादळात अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु आजतागायत अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, हे त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.
२९ जून २०२५ वादळाचे ९०० हेक्टरवरील नुकसानीचे मुद्दे अधोरेखित
नुकत्याच झालेल्या वादळात सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी सरकारकडे मागणी केली की,
➡️ "नुकसानीची तातडीने पाहणी करावी
➡️ नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी
➡️ आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कृषी विभागाने कार्यपद्धतीत गती आणावी."
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार – आमदार जावळे
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भूमिकेत अजिबात बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट करत, "शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, त्याचा अपमान किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही," असा सज्जड इशारा सरकारला दिला
🖋️ लेवाजगत न्यूज | शेतकऱ्यांचा आवाज
✍️ आपणही आपल्या भागातील शेतकरी प्रश्न, लोकप्रतिनिधींची भूमिकेविषयी माहिती पाठवू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत