सीएसटीला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा – आमदार भास्कर जाधव यांची मागणी
सीएसटीला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा – आमदार भास्कर जाधव यांची मागणी
लेवाजगत न्यूज मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असले, तरी आजही या स्थानकाच्या परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा नाही. या पुतळ्याची उभारणी व्हावी, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधानांसह इतर संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
या मागणीला पाठिंबा देत आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारने यासंदर्भात पुढाकार घ्यावा आणि केंद्र सरकारकडे ठराव पाठवावा, अशी जोरदार मागणी केली आहे. "मुख्यमंत्र्यांनी किंवा विधानसभा अध्यक्षांनी असा ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा," अशी विनंती त्यांनी विधानसभेत मांडली.
त्याचप्रमाणे, मुंबईच्या इतिहासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या समाजसुधारक नाना जगन्नाथ शंकर शेट यांच्या नावाने ‘मुंबई सेंट्रल’ रेल्वे स्थानकाचे नामकरण करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, यासाठीही राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
या दोन्ही मागण्यांमुळे महाराष्ट्राच्या इतिहास व परंपरेला सन्मान मिळेल, असेही भास्कर जाधव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत