माजी नगराध्यक्ष कै.नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
माजी नगराध्यक्ष कै. नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी):श्री.आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, तसेच पीएमश्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर आणि पालक-शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगराध्यक्ष व दानशूर व्यक्तिमत्व कै. नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
लक्ष्मी विष्णू ट्रस्टच्या माध्यमातून कै. वसंतराव, कै. रविंद्र व कै. सुधीर विष्णू पाटील या दानशूर कुटुंबीयांनी एक लाख रुपयांची अनामत रक्कम दोन्ही शाळांमध्ये ठेवली आहे. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम नानासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात कै. नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
शैक्षणिक साहित्याचे वाटप नानासाहेब पाटील यांचे नातू मनोज वसंतराव पाटील व नात सून वैशाली मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.जी.भालेराव होते.
प्राचार्य भालेराव यांनी आपल्या मनोगतात माजी नगराध्यक्ष कै. नानासाहेब पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे स्मरण करत दानशूर पाटील कुटुंबाचे आभार मानले.
एस.एम.महाजन यांनी विद्यार्थ्यांना नानासाहेब पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास थोडक्यात उलगडून सांगितला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका पुष्पालता ठोंबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष तेली, उपाध्यक्ष शितल बेंडाळे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कलाध्यापक नंदू पाटील यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत