Header Ads

Header ADS

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषदांचा स्वच्छतेत डंका – स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये भरीव यश,सावदा नगरपालिकेला ODF++ दर्जा प्राप्त

 

Municipal councils in Jalgaon district achieve great success in cleanliness survey 2024, Savda Municipality gets ODF++ status

Municipal councils in Jalgaon district achieve great success in cleanliness survey 2024, Savda Municipality gets ODF++ status

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषदांचा स्वच्छतेत डंका – स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये भरीव यश,
सावदा नगरपालिकेला ODF++ दर्जा प्राप्त

लेवाजगत न्यूज जळगाव – स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व 20 नगरपरिषदांनी सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांनी ODF++ दर्जा प्राप्त केला असून काहींनी GFC स्टार मानांकनही मिळवले आहे. ही कामगिरी केवळ गुणांच्या आधारेच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी, स्वच्छ जीवनशैलीसाठी आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची परिणामकारक साक्ष आहे. अमळनेर नगरपरिषदने 9003 गुण मिळवून राज्यात 70 वा क्रमांक पटकावला असून ODF++ दर्जाही मिळवला आहे. चोपडा नगरपरिषदने राष्ट्रीय स्तरावर 105 वा क्रमांक प्राप्त केला असून तिला ODF++ मानांकनासह 1 स्टार GFC देखील मिळाले आहे. जळगाव महानगरपालिकेने 3 स्टार GFC व ODF++ मानांकन मिळवून महानगरांमध्ये आदर्शाची झळ बसवली आहे.

जिल्ह्यातील भडगाव, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, धरणगाव, सावदा, यावल, वराडा, रावेर, भुसावळ, पारोळा आणि शेंदुर्णी या नगरपरिषदांनी ODF++ दर्जा प्राप्त केला आहे. तर मुक्ताईनगर, फैजपूर आणि बोदवड या नगरपरिषदांनी ODF+ मानांकन मिळवले आहे. विशेष अलंगिक मानांकन मिळवलेल्या सावदा, यावल, वराडा आणि चोपडा या नगरपरिषदांनी ODF++ सह 1 स्टार GFC मिळवून प्रगत नगरपरिषद म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. भडगाव नगरपरिषदेने सातत्याने स्वच्छतेकडे वाटचाल कायम ठेवली असून धरणगाव, चाळीसगाव, पाचोरा व एरंडोल या नगरपरिषदाही पुढील स्तर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ही यशोगाथा घडविण्यासाठी नगरपरिषदेतील अधिकारी, अभियंते, स्वच्छता कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे योगदान दिले आहे. आता पुढील टप्पा म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांनी 3 स्टार GFC प्राप्त करण्याचा निर्धार बाळगणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतादूत बनून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, कचरा व्यवस्थापनात सक्रीय सहभाग घेणे आणि स्वच्छतेच्या जनजागृती मोहिमांमध्ये सक्रीय सहभागी होणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्याच्या या यशाबद्दल सर्व नगरपरिषदा, त्यांचे कर्मचारी, नागरिक आणि प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. हे यश ही केवळ सुरुवात असून पुढील वर्षी संपूर्ण जिल्हा 3 स्टार GFC च्या यादीत झळकावी, हीच सर्वांची सामूहिक अपेक्षा आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.