66 वर्षांची परंपरा असलेल्या सावदा नगरपालिका को-ऑपरेटिव्ह कर्मचारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न
66 वर्षांची परंपरा असलेल्या सावदा नगरपालिका को-ऑपरेटिव्ह कर्मचारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) –सावदा नगरपालिका को-ऑपरेटिव्ह कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी पालिकेच्या पूरक इमारतीत उत्साही वातावरणात पार पडली. या संस्थेला तब्बल 66 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी पालिकेचे जेष्ठ कर्मचारी अरुण ठोसरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी उपस्थिती लावली.
सभेला चेअरमन व संचालक मंडळातील राजू साळी, मनोज चौधरी, हमित तडवी, खंडेराव सर, भोईसर, अर्जुन करोसिया, विशाल करोसिया, पूजा लोखंडे, विजय चौधरी आदींसह अनेक सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत सर्व ठराव एकमताने संमत करण्यात आले. यंदा सर्व कर्मचाऱ्यांना रु. 1200 मीटिंग भत्ता, 15 टक्के लाभांश (डिव्हिडंड) आणि प्रत्येक सभासदास एक गिफ्ट वितरित करण्यात आले.
संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करत उपस्थितांनी पुढील वर्षात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत