Contact Banner

निलेश राणे यांना शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी; १९ जुलै ते १६ सप्टेंबरपर्यंत आदेश लागू "माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न"निलेश राणे

Nilesha-rane-yanna-shasakiya-karyalayata-praveshabandi-19jully-16-saptembaraparyanta-adesha-lagu-


निलेश राणे यांना शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी; १९ जुलै ते १६ सप्टेंबरपर्यंत आदेश लागू

 "माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न"निलेश राणे

लेवाजगत न्यूज, फैजपूर – फैजपूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी निलेश उर्फ पिंटू राणे यांना १९ जुलै ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यावल व रावेर तालुक्यांतील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे.






१६ जुलै रोजी फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात राणे यांनी कथितरित्या असभ्य वर्तन केल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याआधी १५ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी चुकीच्या प्रकारे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महसूल कर्मचारी संघटनांनी या प्रकारांचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

या आदेशानुसार, बंदी कालावधीत राणे ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात आणि सुनावणीसाठी दूरध्वनी प्रणालीचा वापर करू शकतात. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना एक तासाची सवलत देण्यात येईल.


राणे यांची प्रतिक्रिया : "माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न"

"मी लोकप्रतिनिधी असून जनतेच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांत जावेच लागते. मधुकर साखर कारखान्यासाठी मी लढा देत आहे आणि यावल तहसीलदारांच्या निलंबनासाठी पाठपुरावा करत आहे. त्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली. हा निर्णय संविधानातील माझ्या अधिकारांच्या विरोधात असून माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे," अशी प्रतिक्रिया निलेश उर्फ पिंटू राणे यांनी लेवाजगत न्यूजशी बोलताना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.