Contact Banner

शेतामध्ये सापडले एक दिवसाचे अर्भक; समाजसेवकांच्या तत्परतेने मिळाले नवीन जीवनदान

 

One-day-old-baby-found-in-a-field;-gave-new-life-gift-with-the-immediate-action-of-social-workers


शेतामध्ये सापडले एक दिवसाचे अर्भक; समाजसेवकांच्या तत्परतेने मिळाले नवीन जीवनदान


 लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा -चिनावल तालुका रावेर दिनांक १८ जुलै आज सायंकाळी ५ वाजता तुषार पाटील यांच्या शेतामध्ये एक दिवसाचे नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. वडगाव शिवारातील उतखेडा रोड परिसरात ही घटना घडली.


अर्भक सापडताच चिनावलचे पोलिस पाटील निलेश नेमाडे आणि समाजसेवक जयेश इंगळे यांनी तातडीने पुढाकार घेत बाळाला त्वरित जळगाव येथील जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सद्यस्थितीत बाळाला ICU मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.


या दुर्धर परिस्थितीत तातडीने मदतीस धावून आलेल्या नागरिकांमुळे एका निष्पाप जीवाला जीवनदान मिळाले आहे. सामाजिक स्तरावर याचे सर्वत्र कौतुक होत आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.