Rajasthan Plane Crash: अचानक मोठ्ठा आवाज अन् शेतात अग्निकल्लोळ; राजस्थानात विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू
Rajasthan Plane Crash: अचानक मोठ्ठा आवाज अन् शेतात अग्निकल्लोळ; राजस्थानात विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू
लेवाजगत न्युज राजस्थान:- राजस्थानच्या चुरुमध्ये विमानाला अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आकाशात मोठ्ठा आवाज झाल्यानंतर शेतातून आगडोंब उसळला. एकाएकी धूर निघू लागला, अशी माहिती अपघात पाहणाऱ्या ग्रामस्थांनी दिली.
राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील रतनगढ भागातील भानुदा गावात हवाई दलाचं विमान कोसळलं. विमानाच्या ढिगाऱ्याजवळ दोन मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमध्ये खळबळ उडाली. जिल्हाधिकारी अभिषेक सुराना आणि स्थानिक पोलीस अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. लष्कराच्या पथकानंदेखील घटनास्थळी गाठलं आहे. या अपघाताचा तपास करण्यासाठी त्यांनी घटनास्थळ सील केलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत