Contact Banner

सावदा श्री स्वामीनारायण मंदिरात शिव महापुराण कथा-१११ वर्षांची परंपरा जपणारे धार्मिक आयोजन

 

Religious event in Savada Shree Swaminarayan Temple, reciting the Shiva Mahapuran story, a 111-year-old tradition


सावदा श्री स्वामीनारायण मंदिरात शिव महापुराण कथा-१११ वर्षांची परंपरा जपणारे धार्मिक आयोजन


सावदा (प्रतिनिधी) — खानदेशातील वडतालधाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे श्रावण मासानिमित्त शिव महापुराण कथेचे दिनांक २७ जुलै पासून आयोजन करण्यात आले असून, ही कथामंदिरातील भगवंत हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांच्या आशीर्वादाने पार पडत आहे.






या १११ वर्ष पुरातन मंदिरात, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भक्तिभावाने कथेचे आयोजन करण्यात आले असून, धर्मप्रसादासजी महाराज यांच्या आशीर्वादाने व शास्त्री स्वामी भक्तीप्रकाश दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्री स्वामी अनंतप्रकाश दासजी आपल्या वाणीने शिवमहापुराण कथेस भक्तांपर्यंत पोहोचवत आहेत.


ही कथा श्री स्वामीनारायण मंदिराच्या कथा सभागृहात, दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत चालणार आहे. एक महिना चालणाऱ्या या कथेचे नियोजन कोठारी स्वयंप्रकाश दासजी, धर्म किशोर दासजी, विश्व प्रकाश दासजी, स्वामी माधव भंडारी व पुजारी सत्यप्रकाश दासजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.


या आयोजनासाठी मंदिरातील संतवर्ग, महिला मंडळ आणि युवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले असून, सर्व भाविक भक्तांना या पावन श्रावण महिन्यात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ही कथा केवळ धार्मिकच नव्हे तर एक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग ठरणार असून, मंदिराच्या शतकाहून अधिक काळाच्या समृद्ध परंपरेचा भाग बनून भक्तांना अनोखी अनुभूती देणारी ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.