दुचाकींची आमोदा येथे समोरासमोर धडक – एक गंभीर, एक जखमी
दुचाकींची आमोदा येथे समोरासमोर धडक – एक गंभीर, एक जखमी
लेवाजगत न्यूज | आमोदा – रविवार रात्री सुमारे ९:१५ वाजता आमोदा गावा जवळ दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
प्राप्त माहितीनुसार, होंडा कंपनीची दुचाकी (क्र. MH 19 - 5697) ही भुसावळकडून येत होती, तर प्लेटिना दुचाकी (क्र. MH 19 DJ 4425) ही फैजपूरहून बामणोदकडे जात होती. या दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन फैजपूरचा जमील तडवी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दुसरा जखमी युवक, कल्पेश महाजन (रा. बामणोद) याला देखील दुखापत झाली असून त्याची वैद्यकीय मदत फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात करण्यात आली आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत