शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद गिरवत आहेत मराठीचे धडे; “वाघाची मावशी फारच आळशी…”
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद गिरवत आहेत मराठीचे धडे; “वाघाची मावशी फारच आळशी…”
लेवाजगत न्यूज नेटवर्क –शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे सध्या दोन दिवस पासून प्रत्यक्ष मराठी शिकण्याची मोहीम सुरू केली आहे. “वाघाची मावशी फारच होती आळशी”, “आली आली दिवाळी, बहीण भावाला ओवाळी” अशी वाक्यं त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उच्चारून दाखवली. यावरून त्यांच्या मराठी अभ्यासाची प्रगती दिसून आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शंकराचार्य मराठीचे नियमित धडे गिरवत असून, त्यांच्यावर दोन शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. “माझ्या उच्चारात आणि ‘ळ’ चा उच्चार करताना अडचण आहे,” असं त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं, मात्र “फार वेगाने प्रगती होते आहे आणि दोन महिन्यांत ते चांगली मराठी बोलतील,” अशी आशाही व्यक्त केली आहे.
मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचे मत –
शंकराचार्यांना मराठीत संवाद साधणे जमू लागले आहे. “दोन महिने मुक्काम इथेच आहे का?” असे विचारल्यावर त्यांनी “हो, दोन महिने इथेच मुक्काम आहे,” असे मराठीत उत्तर दिले. तसंच, “सकाळी मी फळांचा नाश्ता केला,” असे सांगत त्यांच्या संवाद कौशल्यात होत असलेली प्रगती स्पष्ट केली.
“उद्या सकाळी ११ वाजता शिकवणी आहे,” असे शिक्षकांनी सांगितल्यावर, “हो,” असे उत्तर देत त्यांनी मराठीचा सराव दाखवला.
मराठीबाबत अविमुक्तेश्वरानंद यांचे विचार –
“आपण ज्या राज्यात राहतो, तिथली भाषा आलीच पाहिजे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. टीव्ही९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “मराठी शिकण्याची प्रक्रिया मी सुरू केली आहे, ही भाषा समजून घेण्याचा आणि सन्मान करण्याचा माझा प्रयत्न आहे.”
मराठी वादावर दिली होती ठाम प्रतिक्रिया –
दोन दिवसांपूर्वी मराठीच्या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले होते, “मराठीचा प्रचार-प्रसार कोणी करतोय याला विरोध नाही. पण जर कुणी मराठी ही कानशिलात लगावण्याची भाषा बनवत असेल, तर त्यातून मराठीला आदर मिळेल का, की विरोध वाढेल?” त्यांनी मराठी भाषेचं कौतुक करत “संपूर्ण देश मराठीवर प्रेम करतो, फक्त मराठी माणसांनीच नव्हे,” असंही नमूद केलं.
मराठी शिकण्यामागचं कारण स्पष्ट –
शंकराचार्य म्हणाले, “हिंदी ही देशाची राजभाषा आहे, पण मराठीही देशातील समृद्ध भाषा आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई सुद्धा महाराष्ट्रातूनच गेली होती. मराठीचा आदर सगळीकडे आहे.”
सध्या चाळीस दिवसांचा त्यांचा महाराष्ट्रात मुक्काम असून त्यानंतर ते इतरत्र जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
निष्कर्ष –
धर्मसत्ता आणि भाषाविकास यांचा अनोखा संगम शंकराचार्यांच्या या उपक्रमातून घडताना दिसतो आहे. मराठी शिकण्याचा त्यांचा प्रयत्न हा केवळ भाषिक जडणघडण नव्हे, तर राज्यवासीयांप्रती असलेले भावनिक नातेही अधोरेखित करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत