नवजात अर्भकाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार – अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयातील घटना
नवजात अर्भकाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार – अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयातील घटना
छत्रपती संभाजीनगर – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (स्वाराती) येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात ९०० ग्रॅम वजनाच्या नवजात अर्भकाला मृत घोषित करण्यात आले होते. मात्र, काही तासांनी त्याच्या शरीरात हालचाल जाणवून पालकांनी पुन्हा रुग्णालय गाठले. सध्या त्या अर्भकावर उपचार सुरू आहेत.
घटनेचा तपशील:
होळ (ता. अंबाजोगाई) येथील एक २७ आठवड्यांची गर्भवती महिला स्वाराती रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाली होती. गर्भाशयाची पिशवी फुटल्याचे निदान झाले. तपासणीदरम्यान अर्भकामध्ये कोणतीही जिवंत असल्याची चिन्हे नसल्याचे सांगण्यात आले. ७ जुलै रोजी तिची प्रसूती झाली आणि ९०० ग्रॅम वजनाचे अर्भक जन्मले. त्यातही कोणतीही हालचाल नसल्यामुळे अर्भकाला मृत घोषित करण्यात आले.
रात्रभर अर्भकाला काचेच्या पेटीत ठेवून, दुसऱ्या दिवशी पालकांच्या हवाली करण्यात आले. तेव्हा घरी गेल्यावर घरातील ज्येष्ठ महिलेला अर्भकाच्या हालचाली जाणवू लागल्या. पालकांनी तातडीने रुग्णालयात परत धाव घेतली, आणि आता त्या अर्भकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालय प्रशासनाची भूमिका:
स्वारातीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "हा प्रकार गंभीर असून रुग्णालयाने स्वतःहून (सुमोटो) चौकशी सुरू केली आहे. दोन समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे."
वैद्यकीय दृष्टिकोनातून काय म्हणतात तज्ज्ञ?
स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी स्पष्ट केले की, "२७ आठवड्यांमध्ये झालेली प्रसूती ही प्रीमॅच्युअर असल्याने अर्भकाचे अवयव पूर्ण विकसित नसतात. त्यामुळे अर्भकाच्या हालचाली किंवा हृदयाचे ठोके ओळखणे कठीण असते. अनेक वेळा वैद्यकीय भाषेत ‘सस्पेंडेड अॅनिमेशन’ स्थितीमुळे अशा चुकांची शक्यता राहते."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत