उरण ते दादर अटल सेतू मार्गे एस.टी. सेवा सुरु करावी – श्रीकांत पाटील यांची मागणी
उरण ते दादर अटल सेतू मार्गे एस.टी. सेवा सुरु करावी – श्रीकांत पाटील यांची मागणी
प्रतिनिधी | उरण – सुनिल ठाकूर-उरण-अलिबाग परिसरातील नोकरदार, व्यवसायिक, व्यापारी, कोळी बांधव, फुलविक्रेते यांना रोज मुंबईत प्रवास करावा लागतो. सध्या उपलब्ध वाहतूक सुविधांमुळे वेळ आणि खर्च या दोन्ही बाबतीत त्यांना त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर अटल सेतू मार्गे उरण ते दादर दरम्यान एस.टी. बससेवा सुरु करण्याची मागणी चिर्ले ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकांत शंकर पाटील यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक (मुंबई सेंट्रल) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पाटील यांनी त्यांच्या निवेदनात सकाळी ६ वाजता व ८ वाजता उरणहून, तसेच संध्याकाळी ६ वाजता व रात्री ८ वाजता दादरहून अशा दोन फेऱ्यांमध्ये ही सेवा सुरु करावी, अशी विनंती केली आहे.
या मागणीचे निवेदन हर्षवर्धन सपकाळ (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) आणि काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र घरत यांनाही देण्यात आले आहे. प्रवाशांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी ही सेवा तातडीने सुरु करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत