मुक्ताईनगर येथे चिमुकल्यावर काळाचा घाला – शाळेतच विद्यार्थ्याचा मृत्यू!
ब्रेकिंग न्यूज | मुक्ताईनगर : चिमुकल्यावर काळाचा घाला – शाळेतच विद्यार्थ्याचा मृत्यू!
लेवाजगत न्यूज, मुक्ताईनगर –
मुक्ताईनगर शहरातील जे.ई. स्कूल मध्ये शिकणाऱ्या सातवीच्या वर्गातील चैतन्य शंकर मराठे (वय १३, रा. मुंढोळदे) या विद्यार्थ्याचा आज (बुधवार, ३० जुलै) दुपारी अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेहमीप्रमाणे शाळेत आलेल्या चैतन्यने जेवण करून मित्रांसोबत खेळ सुरू केला. खेळाच्या थोड्याच वेळात त्याने पाणी प्यायले व बाकावर बसला. मात्र, काही क्षणातच त्याची तब्येत बिघडली आणि तो कोसळला. शिक्षकांनी तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी जवळच्या रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चैतन्यच्या मृत्यूची माहिती मिळताच शाळेत आणि गावात शोककळा पसरली. आई-वडील व नातेवाईकांनी शाळेतच हंबरडा फोडला. अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. प्राथमिक माहितीप्रमाणे, हृदयविकाराचा झटका ही मृत्यूमागील शक्यता मानली जात असून अधिकृत कारणाचा तपास सुरू आहे.
शाळेत आणि मुक्ताईनगर परिसरात यामुळे शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत