Header Ads

Header ADS

१५ किलो गांजासह दोन इसम अटकेत; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई

 

Two-arrested-with-15kg-of-marijuana;-Amalner- police-conduct-major operation


१५ किलो गांजासह दोन इसम अटकेत; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई

लेवाजगत न्यूज – अमळनेर (जि. जळगाव) – अमळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडसत्र राबवत १५ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोन इसमांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ३.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १५ जुलै २०२५) रात्री उशिरा जळोद गावाजवळ करण्यात आली.

पोलिस नाईक अमोल पाटील हे नियमित गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन इसम मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी अमळनेरकडे येत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन पोलिसांचे पथक जळोद गावात रवाना झाले.





रात्री १०:१० वाजता जळोद शिवारातील रस्त्यावर एक काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना (क्रमांक MH 19 CT 4845) मोटारसायकल आढळून आली. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या गोणीत १५ किलो वजनाचा गांजा आढळून आला.

दोघांची ओळख पटवली असता ते महेश कैलास पाटील (वय ३१, रा. भडगाव) आणि नितीन शरद गौड उर्फ मसराम (वय १९, रा. पाचोरा) असल्याचे निष्पन्न झाले. सदर गांजाची बाजारभावानुसार अंदाजे किंमत ₹३,००,०००/- असून वापरण्यात आलेली मोटारसायकल ₹४०,०००/- किंमतीची आहे. एकूण ₹३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८, २०, २२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील लोखंडे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सपोनि रविंद्र पिंगळे, सुनील लोखंडे, पोहेका संतोष नांगरे, अमोल पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, उज्वलकुमार म्हस्के, हर्षल पाटील, योगेश बागुल, समाधान सोनवणे, सुनिल पाटील व होमगार्ड पुनम हटकर आदींनी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.