Header Ads

Header ADS

आ.अमोल जावळे यांच्या पुढाकाराने २५ ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया : ‘मोतीबिंदूमुक्त तालुका’ अभियानाला वेग


Āmadāra-amōla-jāvaḷē-yān̄cyā-puḍhākārānē-25-jyēṣṭha-nāgarikānvara-yaśasvī-mōtībindū-śastrakriyā-‘mōtībindūmukta-tālukā’-abhiyānālā-vēga



आ.अमोल जावळे यांच्या पुढाकाराने २५ ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया : ‘मोतीबिंदूमुक्त तालुका’ अभियानाला वेग

लेवाजगत न्यूज यावल – यावल-रावेर तालुक्यातील नागरिकांना ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून रविवारी २५ ज्येष्ठ नागरिकांवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागात यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पडल्या असून, उपचारानंतर रुग्णांना आवश्यक औषधोपचारासह रुग्णवाहिकेची सोय करून घरी पाठविण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

या शस्त्रक्रियांच्या यशस्वीतेसाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. शोबिया अन्सारी, डॉ. वृंदा कुंभारे, डॉ. भारती वाणी, डॉ. मयुरेश डोंगरे आणि डॉ. स्वाती असोले यांचे विशेष योगदान लाभले.

यशस्वी अंमलबजावणीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यात शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज पाटील, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील, होनाजी चव्हाण, चैतन्य कोल्हे व तुषार घुगे पाटील यांचा मोलाचा सहभाग होता.

“अनेक गरीब व दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे योग्य नेत्रउपचार मिळत नाहीत. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे. हे समाधान देणारे कार्य असून, ‘मोतीबिंदूमुक्त यावल-रावेर तालुका’ या उद्दिष्टासाठी अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाईल,” असे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले.

या लोककल्याणकारी पुढाकारामुळे अनेक गरजू नागरिकांना नवे आयुष्य मिळाले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.