स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लेवा युथ फोरम तर्फे विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लेवा युथ फोरम तर्फे विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर
लेवाजगत न्यूज खेमचंद पाटील (बदलापूर)- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी बदलापूर डोंबिवली अंबरनाथ येथे लेवा युथ फोरमच्या पुढाकाराने तीन भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
दिवसेंदिवस होणाऱ्या विविध आजारांमुळे आज काल मानवी जीवन धोक्यात येत आहेत आणि रुग्णाला वेळेवर रक्त मिळत नाही. याच रूपाने देशभक्तीला कृतीत उतरवून मानवी जीवनाबद्दलची जबाबदारी सेवाभावातून साकार करणे हा उद्देश ठेवत लेवा युथ फोरम रुग्णांसाठी का नेहमीच तत्पर राहून कार्य करीत असते.
लेवा युथ फोरम टीम बदलापूर समिती व सदस्य यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत रक्तदान शिबिराची उत्साहात सुरुवात झाली. बदलापूर येथे 130 तर डोंबिवली येथे ३८ आणि अंबरनाथ येथे २५ या रक्तदात्यांनी समाजसेवेचे उदाहरण उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान हेच जीवदान या तत्त्वाने स्वेच्छेने रक्तदान केले.
त्यावेळी श्री. अरुण सुरवळ (माजी नगरसेवक, शिवसेना), श्री. किरण भोईर (माजी नगरसेवक, भाजप), सौ. शितलताई राऊत (माजी नगरसेविका, शिवसेना), सौ. विजयाताई राऊत (माजी नगराध्यक्ष), श्री. प्रदीप गिते (माजी नगरसेवक), श्री. किशोर भाऊ पाटील (शहर प्रमुख, शिवसेना [उबाटा], श्री. कृष्णा दादा धुमाळ (तालुकाप्रमुख, युवासेना), कु. आकाश राऊत व श्री. सचिन राऊत(समाजसेवक)
लेवा युथ फोरम शहराध्यक्ष हितेश भोळे यांच्यासह बदलापूर शहरातील समाजसेवक आणि लेवा पाटीदार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी रक्ताच्या प्रत्येक थेंबातून समाजाला व देशाला नवे जीवन देणे ही खरी देशभक्ती आणि सेवाभावाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे." हा संदेश देत कार्यक्रमाला उत्साह वाढवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत