Contact Banner

आमोदा गावातील हिमानी राजपूत पहिल्याच प्रयत्नात एमएच-सेट परीक्षेत यशस्वी

 

Āmōdā-gāvātīla-himānī-rājapūta-pahilyācha-prayatnāta-MH-SET-parīkṣhēta-yaśashvī


आमोदा गावातील हिमानी राजपूत पहिल्याच प्रयत्नात एमएच-सेट परीक्षेत यशस्वी


लेवाजगत न्यूज आमोदा: आमोदा गावातील सुपुत्री हिमानी चेतन राजपूत हिने जून २०२५ मध्ये पार पडलेली महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता प्रदान करणारी आहे.


हिमानी राजपूत या आमोदा गावातील व्यापारी चेतन पाटील व ललित पाटील यांच्या कन्या आहेत. चेतन पाटील व ललित पाटील हे दोघेही गावात आपला व्यवसाय (दुकान) सांभाळतात. हिमानी यांनी आपले व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण (एम.कॉम.) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले असून सध्या त्या डी.एन. कॉलेज, फैजपूर येथील वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.


आपल्या यशाविषयी हिमानी राजपूत म्हणाल्या, “कुटुंबीयांचा विश्वास व पाठिंबा आणि महत्त्वाचे आणि मोठे व्यक्तिमत्व असलेले परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचा आशीर्वाद व विश्वास मला नेहमीच प्रेरणा देत आला आहे."

  त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, महाविद्यालय तसेच आमोदा गावाचा अभिमान वाढला असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.