Contact Banner

रावेर तालुक्यात आदर्श ठरलेली चिनावल ग्रामपंचायत – महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

 

The Mahatma Gandhi Dispute Resolution Office, a model village in Raver taluka, was inaugurated with enthusiasm.

रावेर तालुक्यात आदर्श ठरलेली चिनावल ग्रामपंचायत – महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

लेवाजगत न्यूज चिनावल, ता. रावेर |
रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये आदर्श ठरलेली चिनावल ग्रामपंचायत आता स्वतंत्र महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालय स्थापन करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०वाजून ३०मिनिटांनी  या कार्यालयाचे उद्घाटन सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते तर सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले.

या प्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष जितेंद्र नेमाडे, पोलिस पाटील निलेश नेमाडे, उपसरपंच भावना योगेश बोरोले, माजी जि.प. सदस्य तनुजा सरोदे, पुष्पा तायडे, सुरेखा पाटील, माधुरी नेमाडे, माजी सरपंच योगेश बोरोले, उज्वला भंगाळे, चंद्रकांत भंगाळे, सुरेश गारसे, दामोदर महाजन तसेच पं.स. सदस्य गोपाळ नेमाडे, माजी सभापती ठकसेन पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दिपक बंडु कोळी यांच्यासह गावातील विविध गणेश मंडळे, दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना सपोनि विशाल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “गावातील छोट्या-मोठ्या भांडणांचे निवारण आता या तंटामुक्ती कार्यालयातून होणार असून गावात शांतता, सौहार्द आणि ऐक्याचे वातावरण निर्माण होईल.” तसेच त्यांनी समिती अध्यक्ष जितेंद्र नेमाडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छाही दिल्या.

या वेळी सावदा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक राहुल सानप, बिट अंमलदार विनोद पाटील, सुनील जोशी, मझहर पठाण, निलेश बावीस्कर, राजेश बोदडे, मयुर पाटील, राहुल येवले आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.