फैजपूर येथे गुरुवर्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचे आगमन
फैजपूर येथे गुरुवर्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचे आगमन
लेवाजगत न्यूज फैजपूर – धर्मजागृती व धर्मकार्य प्रसारासाठी गेलेले ४५ दिवस परदेश दौरा करून आज दिनांक १८ ऑगस्ट रोजी फैजपूर येथील गादीपती सतपंत मंदिर संस्थांचे गुरुवर्य परम पूज्यनीय महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचे आगमन झाले.
या काळात स्वामीजींनी हेमिल्टन (कॅनडा), न्यू जर्सी, शिकागो, लैकेन्स्टर (अमेरिका) तसेच इतर ठिकाणी धर्मप्रचार व समाजजागृतीसाठी प्रवास करून विविध ठिकाणी मार्गदर्शन केले.
फैजपूर येथे आगमनानंतर भक्तगणांनी महाराज श्रींचे हार्दिक स्वागत व सत्कार केला. या प्रसंगी गुरुवर्य महाराजांनी परदेश दौऱ्यातील विविध प्रसंगांविषयी, तसेच धर्मप्रसाराच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व उपस्थितांना मार्गदर्शन करून आशीर्वाद दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत