रावेर तालुक्यातील नागझिरी नाल्याच्या पाण्यामुळे बक्षिपूर येथे संरक्षण भिंत कोसळली-प्रशासनाची पाहणी
रावेर तालुक्यातील नागझिरी नाल्याच्या पाण्यामुळे बक्षिपूर येथे संरक्षण भिंत कोसळली-प्रशासनाची पाहणी
लेवाजगत न्यूज जळगाव –रावेर तालुक्यातील बक्षिपूर गावातील जूनी संरक्षण भिंत नागझिरी नाल्यातील जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज महसूल विभागाच्या अधिकारीवर्गाने केली.
या पाहणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रभारी उपविभागीय अधिकारी फैजपूर निवृत्ती गायकवाड, रावेरचे तहसीलदार बंडू कापसे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची सविस्तर माहिती घेतली व स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती मदत व उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेमुळे बक्षिपूर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पुढील कार्यवाही वेगाने करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत