‘केळी मूल्य साखळी संमेलन 2025’ जळगाव जिल्ह्यातील सावदा(बनाना सिटी)मध्ये उत्साहात संपन्न; शेतकरी, उद्योग व संशोधन संस्थांचा यशस्वी समन्वय
‘केळी मूल्य साखळी संमेलन 2025’ जळगाव जिल्ह्यातील सावदा(बनाना सिटी)मध्ये उत्साहात संपन्न; शेतकरी, उद्योग व संशोधन संस्थांचा यशस्वी समन्वय
लेवाजगत न्यूज सावदा (जळगाव) – यारा इंटरनॅशनलची सहाय्यक कंपनी यारा इंडिया आणि केळी संशोधन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘केळी मूल्य साखळी संमेलन 2025’ चे आयोजन जळगाव येथे करण्यात आले. “उत्पादकतेपासून समृद्धीकडे – केळी मूल्य साखळी बळकट करणे” या संकल्पनेनुसार पार पडलेल्या या संमेलनात केळी उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर चर्चा करत, शाश्वत शेती, बाजारपेठ संधी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीच्या दिशेने विविध उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला.
‘Banana Value Chain Conference 2025’ concluded with enthusiasm in Savda (Banana City) of Jalgaon district; Successful coordination of farmers, industry and research institutes
५०० हून अधिक शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योगतज्ज्ञ, व्यापारी, निर्यातदार, कोल्ड चेन आणि प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी संस्था आणि व्यापारी मंडळांनी सहभाग घेतलेल्या या एकदिवसीय संमेलनात क्षेत्रीय सहकार्याची नवी वाटचाल सुरू झाली. संमेलनात हवामान स्नेही शेती, काढणीपश्चात व्यवस्थापन, दरनिर्धारण प्रणाली, शाश्वत तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन या महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक सत्रे व पॅनल चर्चांद्वारे सखोल विचारमंथन करण्यात आले.
शेतकऱ्यांनी आपले अनुभव, अडचणी आणि यशोगाथा मांडत प्रत्यक्ष जमिनीवरचा दृष्टिकोन उघड केला. याशिवाय, नव्या केळी जातींचे तसेच मूल्यवर्धित केळी उत्पादनांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते, ज्यामुळे उत्पादनाच्या आर्थिक व पौष्टिक बाजूला अधोरेखित करण्यात आले.
श्री कुर्बान मुराद तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव) यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, "या संमेलनामुळे केळी उत्पादकांना नव्या युगात वाटचाल करण्याची दिशा मिळणार आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि भागीदारी यामुळे रोजगार आणि आर्थिक विकासास चालना मिळेल."
संजिव कांवर (व्यवस्थापकीय संचालक, यारा साउथ एशिया) यांनी यारा इंडियाचा दृष्टिकोन स्पष्ट करताना म्हटले की, “उत्पादनवाढीपलीकडे ‘चांगलं उत्पादन आणि चांगलं उत्पन्न’ यावर लक्ष केंद्रीत करणं हे आमचं ध्येय आहे.”
डॉ. अरुण भोसले (उद्यानतज्ज्ञ) यांनी भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “संशोधन संस्था आणि कृषी उद्योग यांच्यातील समन्वयातूनच शेतकरी सक्षम होऊ शकतात.”
कार्यक्रमास यारा फर्टीलायझरचे झोनल हेड भान सिंग, चिफ ऍग्रोनॉमिस्ट राजीव मिश्रा, रिजनल ऍग्रोनॉमिस्ट विकास घुमरे, कम्युनिकेशन प्रमुख वैशाली चोप्रा व वनिषा विज उपस्थित होत्या.
संमेलनाचा समारोप यारा इंडिया आणि केळी संशोधन केंद्र यांच्यातील दृढ सहकार्य आणि शाश्वत, मूल्याधारित आणि शेतकरी-केंद्रित 'केळी मूल्य साखळी इकोसिस्टीम' विकसित करण्याच्या संकल्पाने झाला.
%20of%20Jalgaon%20district.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत