Contact Banner

भोरगाव लेवा पाटीदार समाज युवा समिती व अंबरनाथ लेवा पंचायत तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

 

भोरगाव लेवा पाटीदार समाज युवा समिती व अंबरनाथ लेवा पंचायत तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

भोरगाव लेवा पाटीदार समाज युवा समिती व अंबरनाथ लेवा पंचायत तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

लेवाजगत न्यूज अंबरनाथ : भोरगाव लेवा पाटीदार समाज युवा समिती आणि अंबरनाथ लेवा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डॉ. वृषाली भारंबे यांच्या क्लिनिक येथे पार पडले.

शिबिराचे उद्घाटन अंबरनाथ शहराचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी शिवसेना पक्ष निरीक्षक व माजी नगरसेवक सुभाष साळुंके, माजी नगराध्यक्ष सुनील दादा चौधरी, नगरसेवक कुणाल भोईर, सौ. सुवर्णा साळुंखे, डॉ. कुणाल चौधरी, डॉ. रितेश भारंबे, तसेच भोरगाव लेवा पाटीदार पंचायत समितीचे मुंबई विभाग अध्यक्ष बाळू नेहेते, सचिव सौ. भाग्यश्री पाचपांडे, उपाध्यक्ष सौ. निशा अत्तरदे, खानदेश सेना उपाध्यक्ष नितीन जावळे, सामाजिक कार्यकर्ते प्रतिभा वराडे, विजय दादा वराडे, युवा समिती मुंबई विभाग प्रमुख मयुरेश कोल्हे, प्रतिक वराडे, भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक, नगरसेविका अनिता अदक, माजी नगरसेवक तुळशीराम चौधरी, सौ. सरिता चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात अंबरनाथ परिसरातील १७६ नागरिकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. शिबिरामध्ये रक्त तपासणी, BMD, न्यूरोपथी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉ. वृषाली भारंबे आणि डॉ. मीनाक्षी नारखेडे यांनी केले.

या उपक्रमाला अंबरनाथ शहर समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव स्मिता चौधरी, कार्याध्यक्ष किरण नेमाडे, उपाध्यक्ष भरत महाजन, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
सर्वांच्या प्रयत्नामुळे आरोग्य शिबिराला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.