स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे – डॉ. रवींद्र भोळे
स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे – डॉ. रवींद्र भोळे
लेवाजगत न्यूज शिंदवणे (वार्ताहर) : “आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही. अनेक देशभक्तांनी यज्ञ, दान, त्याग, तप केले आणि अखेरीस बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण सदैव व्हावे आणि त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे,” असे उद्गार ज्येष्ठ समाजसेवक व सल्लागार सदस्य डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले.
श्री संत यादव बाबा हायस्कूल, शिंदवणे येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन
या प्रसंगी डॉ. भोळे म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान पूज्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या शूरवीरांनी दाखविलेला पराक्रम अद्वितीय आहे. या मोहिमेमुळे जगभरात भारताच्या लढाऊ रणनीतीची दखल घेण्यात आली आणि देशाचा दबदबा निर्माण झाला. हा भारतवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन व उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खादी ग्रामोद्योग प्रकल्प संचालक प्रकाशजी जगताप उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषाताई महाडिक, उपाध्यक्ष रामदास महाडिक, पोलीस पाटील पोपटराव महाडिक पाटील, माजी अध्यक्ष बाळासाहेब कुंजीर, मुख्याध्यापक सुरेश कांचन, संचालक कोंडीबा अण्णा कामठे, समाजसेवक प्रभाकर जगताप, शाळेच्या संचालिका सौ. विद्याताई यादव, सारिका ताई महाडिक, निर्मलाताई महाडिक, शरद महाडिक (अध्यक्ष, संभाजी राजे कुस्ती संकुल) आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेची माहिती देताना, “दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीतही स्व. जनार्दन बापू महाडिक यांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली,” असे सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रम
विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या कवायती, देशभक्तिपर गीते, तसेच ध्वजास मानवंदना देऊन देशप्रेमाचा संदेश दिला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपनार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन लांडे सर यांनी केले.
या प्रसंगी गावकरी, पालकवर्ग, राष्ट्रभक्त नागरिक आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत