Contact Banner

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा येथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा येथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा येथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा येथे कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण जन्माचा देखावा सादर करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या नटखट लीलांचा मनमोहक देखावा, माखन चोरीचा प्रसंग, तसेच गोवर्धन पूजा सादर केली. गोवर्धन पूजेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यानंतर विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या रासलीला सादर केली. या रासलीलेतून प्रेमाचे प्रतीक आणि भावनांची जोपासना कशी करावी याचा सुंदर संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांनी केले होते. शिक्षक वर्गाचेही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.