Contact Banner

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार; रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

Bibaṭyācyā-hallyāta-vr̥d'dha- mahilā-ṭhāra;-rugṇālayāta- nātēvā'īkān̄cī-gardī


बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार; रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

लेवाजगत न्यूज, जळगाव : तालुक्यातील देवगाव शिवारात सोमवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात ६० वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. डोक्यावर आणि चेहऱ्यावर जबर जखमा झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेजारी बाळू पाटील व रमेश सोनवणे यांनी हा प्रकार पाहून तत्काळ पोलीस पाटील रमेश पाटील यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पाटील व त्यांचे चुलतभाऊ चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत इंदुबाई पाटील यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.