Contact Banner

तांदलवाडी येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न

Tāndalavāḍī-yēthē-'chatrapatī-śivājī-mahārāja-mahārājasva-samādhāna-śibira'-utsāhāta-sampanna



तांदलवाडी येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न

 लेवाजगत न्यूज सावदा – तांदलवाडी तालुका रावेर येथे महाराष्ट्र शासन महसूल विभागांतर्गत "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर" मोठ्या उत्साहात पार पडले. आमदार चंद्रकांत पाटील व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्या प्रयत्नातून आयोजित या शिबिरात तांदलवाडी, मांगलवाडी, बलवाडी, भांबलवाडी, सिंगत, गाते, सुनोदा, वाघोदे खुर्द, शिंगाडी, पुरी, गोलवाडे, खिर्डी बु, खिर्डी खुर्द या गावांतील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

या शिबिरात नागरिकांच्या विविध शासकीय व महसूल विभागाशी संबंधित समस्या तत्काळ सोडवण्यात आल्या. विविध योजनांची माहिती, दस्तऐवज पडताळणी, प्रमाणपत्र वितरण अशा अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.

शिबिराच्या प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह तहसीलदार कापसे, गटविकास अधिकारी मेंढे, नायब तहसीलदार तायडे, शिवाजीराव पाटील, हरीलाल कोळी, श्रीकांत महाजन, महेश चौधरी, दुर्गेश पाटील, राहुल पाटील, सरपंच सुरेखा तायडे, एम.टी. चौधरी, रेखा बोंडे, शुभम पाटील यांचा समावेश होता. यावेळी तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, विभागीय अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.