Contact Banner

स्मार्ट मीटर विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Congress



स्मार्ट मीटर विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

रावेर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तालुक्याच्या वतीने व तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात हे निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर ही मोहीम थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची कुठलीही पूर्व परवानगी अथवा सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. या स्मार्ट मीटरमुळे येणारे वीजबिल मागील बिलांच्या तुलनेत तीन ते चार पट अधिक येत असून, सामान्य जनतेवर आर्थिक भार वाढत आहे. यासंदर्भात महावितरणकडे तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी कोणतीही सुधारणा झालेली नाही.

ज्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, त्या मीटरची चौकशी करून योग्य बिल आकारावे, तसेच यापूर्वी आकारण्यात आलेले अतिरिक्त बिल रद्द किंवा कमी करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.

या प्रसंगी अक्षय राजेंद्र सोनवणे, दुर्गेश कुंड, चेतन महाजन, मोंटू पचेरवालं, तेजस बावस्कर, मयूर कवडकर, निखिल सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.