Header Ads

Header ADS

खडका-झेड. पी. शाळेच्या निवृत्त शिक्षिकेचे वार्धक्याने निधन


Retired teacher of Khadka ZP school dies of old age


खडका-झेड. पी. शाळेच्या निवृत्त शिक्षिकेचे वार्धक्याने निधन

खडका (प्रतिनिधी) : येथील झेड. पी. शाळेतील निवृत्त व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शालिनी जगन्नाथ पाटील (वय ७८) यांचे दिनांक २५ जुलै २०२५ रोजी वार्धक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एक निष्ठावान व आदर्श शिक्षिका हरपल्याची भावना शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे.

श्रीमती पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अपार मेहनत घेतली. त्यांचा साधेपणा, कार्यतत्परता, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम व शिक्षण क्षेत्रातील निष्ठा यामुळे त्या सर्वांच्याच मनात मानाचे स्थान मिळवून गेल्या.

त्यांच्यामागे पती जगन्नाथ पाटील, सुन सुरेखा मनोज पाटील, वृषाली प्रविण पाटील, कन्या संगीता अजय चौधरी, सुलभा मच्छिंद्र बोंडे, मोहिनी अशोक सरोदे, जाऊ मंगल सोपान पाटील, सून एकता सचिन पाटील, अर्चना अनिल इंगळे, तसेच नातवंडे कौस्तुभ, रियान्श, मयंक आणि वैष्णवी असा परिवार आहे.

अंत्यसंस्कार भुसावळ गावातील स्मशानभूमीत नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात पार पडले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.