Contact Banner

डिगबंर महाराज पुण्यतिथी व वार्षिक सभा उत्साहात.

 


डिगबंर महाराज पुण्यतिथी व वार्षिक सभा उत्साहात.


डिगबंर महाराज पुण्यतिथी व वार्षिक सभा उत्साहात.

चिनावल ( लेवाजगत न्यूज वार्ताहर ) चिनावल येथे  वै.डिगबंर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती रावेर यावल तालुका तर्फे आज दि ३० रोजी स्व.वाय .एस पाटील सभागृहात पुण्यतिथी सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली .

    ‌ दरसाल प्रमाणे यंदाही वै.डिगबंर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज चिनावल येथे वैकुंठवासी दिगंबर महाराज समाधी स्थळी प्रथम विधिवत पूजाअर्चा करून टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच हरिनाम कीर्तन सोहळा यावेळी आयोजित केला होता सदर वेळी पंढरपुरात रावेर यावलसह संपूर्ण खानदेशातील वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था व यासाठी भविष्यातील नियोजन गेल्या वर्षातले आर्थिक स्थिती याबाबतचा सविस्तर अहवाल आजच्या वार्षिक सभेत मांडण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे उपाध्यक्ष घनश्याम पाटील सचिव विठ्ठल भंगाळे सर यांचे सह वैकुंठवासी दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक समितीचे सर्व सदस्य व संस्थेच्या सर्व सभासद बंधू मोठ्या संख्येने पुण्यतिथी कार्यक्रमाला तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.