Contact Banner

जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये गणेश विसर्जन उत्साहात

Ganesh immersion at JT Mahajan Polytechnic, Faizpur


जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये गणेश विसर्जन उत्साहात

फैजपूर (लेवाजगत न्यूज वार्ताहर) :जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, न्हावी मार्ग फैजपूर येथे पाच दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गणेश विसर्जन उत्साहात पार पडले. दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी डीजेच्या तालावर नृत्य करत, ढोल-ताशांच्या गजरात, मोठ्या आनंदात गणपती बाप्पाचे विसर्जन केले.

या पाच दिवसांच्या गणेशोत्सवात यावल-रावेर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. सांस्कृतिक वातावरणाने भारलेल्या या उत्सवात विद्यार्थ्यांनी एकोपा व उत्साहाचे सुंदर दर्शन घडवले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी जयेश चौधरी व भूषण राठोड यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच कमिटी मेंबर, संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद महाजन, उपाध्यक्ष श्री. उल्हास चौधरी, मार्तंड भिरुड, सेक्रेटरी व्ही. आर. झोपे, सहसचिव शशिकांत चौधरी, संचालक मंडळ, प्राचार्य पी. एम. राणे, विभाग प्रमुख बी. डी. नेमाडे, सोनाली फेगडे, जयंत बेंडाळे, विनोद बिरोले, मनोज फेगडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्सवात सक्रिय सहकार्य केले.

गणेश विसर्जन सोहळा भक्तिभाव, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात अविस्मरणीय ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.