Header Ads

Header ADS

गणेश मूर्ती आणताना शॉक लागून चौपड्याच्या युवकाचा बऱ्हाणपूर येथे मृत्यू

 

Ganesh-mūrtī-āṇatānā-shocked- lāgūna-cōpaḍyāchyā-yuvakāchā- Burhanpur-yēthē-mr̥utyū


गणेश मूर्ती आणताना शॉक लागून चौपड्याच्या युवकाचा बऱ्हाणपूर येथे मृत्यू


लेवाजगत न्यूज चोपडा:- गणेश मुर्ती आणताना तारेचा विद्युत प्रवाह ट्रॅक्टरमध्ये उतरल्याने चोपड्याच्या एका भक्ताचा मृत्यू झाला. तर तिघा तरुणांना जबर शॉक बसल्याने ते बाजूला फेकले गेले. ही घटना मध्यप्रदेश राज्यातील  बऱ्हाणपूर येथे घडली. देवेश दिनेश सोनार (वय-२२ रा.मल्हारपूरा, चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

   गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथे गणेशपूर्ती आणण्यासाठी चोपड्यातील रायबा ग्रुपचे बालवीर मित्रमंडळाचे १० ते १२ कार्यकर्ते गेले होते. १५ ऑगस्टला रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूर येथून मृर्ती आणत असताना बऱ्हाणपूर ते शहापूर रस्त्यावर हॉटेल आनंद सागरच्या पुढे उच्चदाबाच्या तारांचा स्पर्श ट्रॅक्टरला झाला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरला. त्यात बसलेल्या चार जणांना जबर शॉक बसला. त्यात ते फेकले गेले. देवेशही या ट्रॅक्टरमध्ये होता. मात्र, त्याच्या पायात चप्पल किंवा बूट नसल्याने त्याला जबर शॉक लागला. त्यात तो जागीच बेशुद्ध झाला, असे मित्र रोशन चौधरी याने वृत्तपत्राला सांगितले. त्याला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


 दि १९ रोजी होते आगमन सोहळ्याच्या मिरवणूकीचे नियोजन 

गेल्या दोन वर्षापासून चोपडा शहरात गणपती स्थापनेपूर्वीच आगमन सोहळ्याची भव्य दिव्य मिरवणूक काढण्याची परंपरा पडली आहे. बालवीर गणेश मंडळाच्या वतीने देखील दि १९ ऑगस्टला चोपड्यात मिरवणूक काढण्यात येणार होती. त्याच पार्श्वभूमीवर गणेश भक्त बऱ्हाणपूर येथे गेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.