Header Ads

Header ADS

पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीत वायू गळती चार जणांचा मृत्यू, इतरांवर उपचार सुरू


Gas leak at Melody Pharma company in Palghar


पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीत वायू गळती,चार जणांचा मृत्यू, इतरांवर उपचार सुरू

वृत्तसंस्था पालघर :-पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेलोडी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या फार्मास्युटिकल कंपनीत आज सकाळी वायू गळतीची दुर्घटना घडली. या अपघातात चार कामगारांचा मृत्यू झाला असून इतर काही कामगारांना प्रकृती बिघडल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

वायू गळतीची घटना घडल्यानंतर काही काळ कामगारांना परिस्थितीची जाणीव झाली नाही. मात्र थोड्याच वेळात अनेक कामगारांची तब्येत अचानक खालावू लागली. तत्काळ आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. गंभीर अवस्थेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, वायू गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.