न्हावीची कन्या डॉ. यज्ञा लढे हिने मिळवला BAMS प्रथम क्रमांक – संतांच्या आशीर्वादाने उजळला गौरवाचा क्षण
न्हावीची कन्या डॉ. यज्ञा लढे हिने मिळवला BAMS प्रथम क्रमांक – संतांच्या आशीर्वादाने उजळला गौरवाचा क्षण
लेवाजगत न्युज न्हावी:-
यावल तालुक्यातील न्हावी येथील डॉ. यज्ञा अनिल लढे हिने अंतिम वर्ष BAMS परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेलं हे यश तिच्या कुटुंबासाठी, गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
श्री. अनिल लढे यांची सुकन्या कु. यज्ञा अनिल लढे हिने
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे येथून
बी.ए.एम.एस. (B.A.M.S.) च्या अंतिम वर्षात प्रथम क्रमांक मिळवून
"डॉक्टर" होण्याचा मान मिळविला आहे.
तसेच तीने बी.ए.एम.एस. गोल्ड मेडल ची मानकरी ठरली त्यामुळे
कुटुंब, गाव व समाजाचा मान उंचावला आहे.
यज्ञाच्या या कामगिरीबद्दल शिक्षक, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.
दरम्यान, यज्ञाला आज वारकरी संप्रदायातील मान्यवर संतांचे आशीर्वादही लाभले. वारकरी रत्न ह.भ.प. श्री. भरत महाराज म्हैसवाडीकर , वारकरी रत्न ह.भ.प. धनराज महाराज अंजाळेकर , शास्त्री श्री. अनंतप्रकाशदासजी , तसेच शास्त्री धर्मकिशोरदासजी,गुरुवर्य श्री. मोहननाथ महाराज यांनी भेट घेऊन डॉ. यज्ञा हिचे अभिनंदन केले व तिला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या भावना हृदयस्पर्शी होत्या –
"धन्य पूर्वपुण्य वोढवले निरुते, संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते…"
संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणेच संतांच्या दर्शनाचा लाभ झाल्याने हा दिवस खऱ्या अर्थाने धन्यता देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. यज्ञा लढेच्या दुहेरी यशामुळे – शैक्षणिक व आध्यात्मिक – न्हावी व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
लेवा जगत परिवारातर्फे डॉ. यज्ञा अनिल लढे यांना खूप खूप अभिनंदन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत