तळोदा–बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण अधिसूचना प्रांत कार्यलय मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही – फैजपूरचे प्रांत अधिकारी
तळोदा–बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण अधिसूचना प्रांत कार्यलय मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही – फैजपूरचे प्रांत अधिकारी
लेवाजगत न्यूज रावेर –भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753 BE तळोदा ते बऱ्हाणपूर या मार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात राजपत्र कलम 3(A) ची अधिसूचना सोशल मिडिया तसेच विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसिध्द होत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
या अधिसूचनेच्या आधारावर रावेर व यावल तालुक्यातील अनेक शेतकरी व जमीनधारक थेट फैजपूर प्रांत कार्यालयात चौकशीसाठी हजर होत असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात प्र.प्रांत /उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी स्पष्ट केले की, “भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753 BE तळोदा ते बऱ्हाणपूर चौपदरीकरणाबाबत कलम 3(A) अन्वये कोणतीही अधिसूचना अद्यापपर्यंत आमच्या कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आलेली नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता केवळ शासन व प्रशासनामार्फत अधिकृतरीत्या प्रसिध्द करण्यात येणाऱ्या अधिसूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत