विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू-एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथिल घटना
विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू-एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथिल घटना
लेवाजगत न्यूज एरंडोल (प्रतिनिधी) –
एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात आज दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अंदाजे १२.३० वाजता घडलेल्या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने शेतात विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. मात्र त्याच तारांना स्पर्श झाल्याने दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुष अशा मिळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मृतदेह पुढील कार्यवाही व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामीण भागातील विजेच्या धोकादायक वापरावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत