जळगाव जिल्ह्यात केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची पाहणी
जळगाव जिल्ह्यात केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची पाहणी
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. १७ ऑगस्ट – यावल तालुक्यातील हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी केली.
भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडतर्फे हे अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार असून, महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते आशेचा किरण ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोगमुक्त, उच्च उत्पादनक्षम आणि परवडणाऱ्या दरातील टिशू कल्चर रोपे वेळेत उपलब्ध होणार आहेत. यामुळे उत्पादनात वाढ होऊन केळी शेतीचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हिंगोणा हे ठिकाण या केंद्रासाठी आदर्श म्हणून निवडण्यात आले आहे. खोल काळी सुपीक माती, पुरेशी पाण्याची उपलब्धता आणि केळी पट्ट्याच्या मध्यभागी असलेला भौगोलिक लाभ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल श्रीमती रक्षाताई खडसे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जळगाव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी ‘बनाना कॅपिटल’ म्हणून अधिक बळकट ओळख निर्माण करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत