Header Ads

Header ADS

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील तरुणाची निर्घृण हत्या-परिसरात खळबळ

 

Jaḷagāva-śaharātīla-rāmēśvara-kŏlanītīla-taruṇācī-nirghr̥ṇa-hatyā-parisarāta-khaḷabaḷa


जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील तरुणाची निर्घृण हत्या-परिसरात खळबळ


लेवाजगत न्यूज जळगाव –जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथिल २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री काम उरकून विशाल मोची आपल्या काकाच्या घरी थांबला होता. दरम्यान मध्यरात्री परिसरात वीजपुरवठा खंडीत झाल्याने तो आपल्या नातेवाईक आकाश जनार्दन मोची व मित्र राहुल भालेराव यांच्यासोबत तक्रार नोंदवण्यासाठी दीक्षित वाडी येथील महावितरण कार्यालयात गेला होता. त्याचवेळी ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्रांनी त्याच्यावर चढाई केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.


हत्या नेमकी का करण्यात आली याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेनंतर जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.