कौस्तुभ उर्फ अनिकेत बावणे यांचे दुर्दैवी निधन ओम कॉलनी, सावदा परिसर शोकमग्न
कौस्तुभ उर्फ अनिकेत बावणे यांचे दुर्दैवी निधन
ओम कॉलनी, सावदा परिसर शोकमग्न
लेवा जगत न्यूज, सावदा:
ओम कॉलनीतील रहिवासी आणि नोकरीनिमित्त सुरत येथे वास्तव्यास असलेले कौस्तुभ उर्फ अनिकेत विकास बावणे (वय २४) यांच्यावर नुकतीच एक दुर्दैवी घटना घडल्याने ते उपचाराधीन होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ३ ऑगस्ट रोजी, रविवारी सकाळी ५ वाजता त्यांचे दुःखद निधन झाले.
ते लिंगायत कोष्टी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विकास सदाशिव बावणे यांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
कौस्तुभच्या अचानक निधनामुळे ओम कॉलनी परिसरात शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभाग दर्शवला आहे.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे व ओम कॉलनी मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत