लेवा सखी कलामंच डोंबिवलीचा गुणगौरव सोहळा व मंगळागौर उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांचा सन्मान, पायलट युवकांचा सत्कार, महिलांचा बहारदार सहभाग
लेवा सखी कलामंच डोंबिवलीचा गुणगौरव सोहळा व मंगळागौर उत्साहात पार पडला
विद्यार्थ्यांचा सन्मान, पायलट युवकांचा सत्कार, महिलांचा बहारदार सहभाग
लेवा जगत न्यूज डोंबिवली (प्रतिनिधी) –
लेवा सखी कलामंच, डोंबिवली व परिसर आयोजित गुणगौरव सोहळा व मंगळागौर कार्यक्रम ३ ऑगस्ट रोजी लेवा भवन, डोंबिवली येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकवर्गाचा भरभरून प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्यामसुंदर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक महाजन, जयश्री अमोल जावळे, वर्षा इंगळे, मेधमाला पाटील, भाग्यश्री पाचपांडे, विजय वराडे, मयुरेश कोल्हे, नितीन जावळे आणि दिगंबर पाटील हे मान्यवर उपस्थित होते. तसेच लेवा मंडळ मुंबई परिसराचे सर्व अध्यक्षही यावेळी हजर होते.
यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तन्मय भूषण चौधरी (अंबरनाथ) आणि हर्षल पाटील (डोंबिवली) हे समाजातील दोन युवक पायलट म्हणून नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आ. राजुमामा भोळे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांनी कार्यक्रमास प्रत्यक्ष भेट देऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "लेवा सखी यांच्याकडून कोणतीही हाक आली तर मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे," असे आश्वासन दिले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा निशाताई अत्तरदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी, श्रद्धा, गुंजन, हेमांगी, सायली, मिनाक्षी, वैशाली, सुरेखा, सोनल, तृप्ती, धारणा, दीपाली तसेच इतर अनेक सखींनी अथक परिश्रम घेतले.
गुणगौरवाबरोबरच महिलांनी पारंपरिक मंगळागौर साजरी करत पारंपरिक गाणी, खेळ व फुगड्यांनी कार्यक्रमास रंगतदार स्वरूप दिले.
हा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम समाजबांधवांसाठी प्रेरणादायी ठरला, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत