मुक्ताईनगर येथील जे.ई. स्कूलमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात साजरी
मुक्ताईनगर येथील जे.ई. स्कूलमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती उत्साहात साजरी
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर :
जे.ई. माध्यमिक शाळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व उपप्राचार्य व्ही. के. शिर्के यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. प्रतिमापूजन प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के व कवयित्री सौ. शितल पाटील यांनी केले. प्रास्ताविक पी. एस. बढे मॅडम यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय एस. एस. कोलते मॅडम यांनी करून दिला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या लेवा गणबोलीतील लेखिका व कवयित्री सौ. शितल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून बहिणाबाईंच्या कवितांमधून उमटणारा कष्ट, प्रयत्नवाद, आत्मबळ व सकारात्मकतेचा संदेश अधोरेखित केला. "स्वतःचे अंतरंग सदगुणांनी भरा, पात्रता वाढवा, आळस सोडा आणि नवनवीन शिकण्यास तयार राहा, यश नक्की मिळेल" असा संदेश देत विद्यार्थ्यांना प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी बहिणाबाईंच्या कवितांमधून दिसणारा दूरदृष्टीकोन आणि कर्मावरील विश्वास यांचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे मांडले. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एस. कोलते मॅडम, एस. आर. ठाकूर सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत