धनाजी नाना महाविद्यालयात ‘इंग्लिश फॉर सक्सेस’ विषयावरील विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा
धनाजी नाना महाविद्यालयात ‘इंग्लिश फॉर सक्सेस’ विषयावरील विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा
लेवाजगत न्यूज फैजपूर –तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ELTAI) खान्देश चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंग्लिश फॉर सक्सेस : कम्युनिकेशन स्किल अँड सॉफ्ट स्किल्स’ या विषयावर विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे संयोजक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे तर समन्वयक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत कार्यरत राहणार आहेत. आयोजन सचिव म्हणून प्रा. डॉ. शशिकला मगरे व प्रा. डॉ. नरेंद्र मुळे यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यशाळेसाठी इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे व्हॉइस प्रेसिडेंट प्रा. डॉ. वैभव सबनीस (धुळे), प्रा. डॉ. खलील अन्सारी (धुळे), प्रा. डॉ. अजबराव इंगळे (निजामपूर-जैताणे), प्रा. डॉ. हेमंतकुमार पाटील (म्हसदी), प्रा. डॉ. नितीन पाटील (अमळनेर), प्रा. डॉ. दिनानाथ पाटील (चोपडा) व प्रा. डॉ. नितीन कापडिस हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री. शिरीषदादा चौधरी तसेच सर्व व्यवस्थापन मंडळ पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्यासह सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहकार्य करीत आहेत.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा मनस्वी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत