सावदा येथे संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक, प्रतिमापूजन उत्साहात
सावदा येथे संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक, प्रतिमापूजन उत्साहात
लेवा जगत न्यूज सावदा : नामिक समाजाचे आराध्य दैवत संतशिरोमणी श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने सावदा येथे साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिरातून संतसेना महाराजांची पालखी मिरवणूक निघाली. गांधी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, मेन रोड, इंदिरा गांधी चौक, भगवान महावीर चौक, दुर्गा माता चौक, दुर्गा माता मंदिर मार्गे पालखी कोचूर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात पोहोचली.
सभागृहात रविंद्र सापकर व ज्योती सापकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन व आरती पार पडली. या वेळी सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, माजी नगरसेविका रेखा वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक भानुदास भारंबे, श्याम पाटील, सिमरन वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाला उद्देशून बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील म्हणाले की, “नाभिक समाज हा शांत असून एकोप्याने राहणे हेच या समाजाचे मोठे भाग्य आहे. समाजातील तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, हेच संतांचे खरे मार्गदर्शन आहे.”
माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “संत सेना महाराज व विठ्ठल भगवान यांचे जसे प्रेम होते तसेच आपणही भगवंताच्या पायी वारीत समाविष्ट होऊन प्रत्येक महिन्याच्या एकादशीला सावदा येथील विठ्ठल मंदिरात उपस्थित राहावे.”
सिमरन वानखेडे यांनी त्यांनी वाचन केलेल्या ग्रंथातील महत्त्वाचे मुद्दे मांडत, “आपणही संतांच्या आचरणाचा अवलंब करून योग्य मार्ग निवडावा, हेच संतशिरोमणींचे खरे कार्य आहे,” असे सांगितले.
या सोहळ्यास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समाज बांधवांतर्फे करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत