Contact Banner

सावदा नगरपालिकेत उलथापालथ निश्चित? मोठ्या उद्योगपती-शिक्षण सम्राटाचा १७ ऑगस्टला राष्ट्रवादीत भव्य प्रवेश!

Upheaval in Savda Municipality- Sure?- Big-Industrialist-Education- Samrat-Grand-Entry-in-Nationalist-On-August-17!


सावद्यातील उद्योग सम्राटाचा ‘पॉलिटिकल धमाका’! 

१७ ऑगस्टला शिक्षण सम्राटाचा राष्ट्रवादीत प्रवेश – पालिका सत्तासमीकरणात भूकंप?

लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) –सावदा शहरातील प्रख्यात उद्योगपती आणि शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक कमावलेले एक नामांकित व्यक्तिमत्व – शिक्षण सम्राट, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.


व्हिडीओ बघा -सावद्यातील प्रख्यात उद्योगपती आणि शिक्षण सम्राटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश?

https://youtu.be/nequZmUpgg0

मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी अजित दादा पवार जळगावच्या नियोजित दौऱ्यावर असताना, सावदा शहरातील या मोठ्या उद्योगपती-सह शिक्षण सम्राटासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील. या प्रवेशामुळे सावदा नगरपालिकेतील आगामी निवडणुकीच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, हा प्रवेश झाल्यास सावदा शहराच्या पालिकेमध्ये सत्तांतरात मोठी उलाढाल होऊ शकते. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या व्यक्तिमत्वाचा पक्षप्रवेश हा स्थानिक पातळीवर सत्तासमीकरण बदलणारा ठरू शकतो. अनेक कार्यकर्त्यांनीही या प्रवेशाबाबत उत्सुकता व्यक्त केली असून, कोण कोण नेत्यांसह प्रवेश घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावदा शहरात याबाबत चांगलीच कुजबुज सुरू असून, नेमके १७ तारखेला काय घडते आणि कोण कोण नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.