वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रोपांना राखी बांधून ‘वृक्षाबंधन’ साजरा
वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रोपांना राखी बांधून ‘वृक्षाबंधन’ साजरा
लेवा जगत न्यूज – फैजपूर प्रतिनिधी : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ‘वृक्षाबंधन’ हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. मियावाकी घनवन प्रकल्पात लागवड केलेल्या रोपांना विद्यार्थिनींनी राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे यांनी भूषविले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. डॉ. सरला तडवी, प्रा. शिवाजी मगर आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे", या तत्त्वानुसार भाऊ-बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थिनींनी रोपांचे संवर्धन आणि जतन करण्याचे वचन देताच महाविद्यालय, घर परिसर तसेच मोकळ्या जागांवर वृक्षलागवड करून समाजात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जयश्री पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मगर यांनी व आभार प्रा. डॉ. सरला तडवी यांनी मानले.
या उपक्रमाचे कौतुक तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री. शिरीषदादा चौधरी, सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केले. “असा आदर्श इतरांनीही घ्यावा,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. मंदार बामनोदकर, प्रा. हेमलता पाटील, प्रा. अदिती ढाके, प्रा. मोहिनी तायडे, श्री. संतोष तायडे, श्री. आर. आर. जोगी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत