Contact Banner

पत्नीला मेसेज केल्यावर तरुणाने घेतला गळफास

Young man gets slapped after texting his wife



 पत्नीला मेसेज केल्यावर तरुणाने घेतला गळफास


लेवाजगत न्यूज निंभोरा ता. रावेर-पत्नीला 'मी आत्महत्या करत आहे' असा मेसेज टाकून निंभोरा येथील वाघोदा रस्त्यावरील रहिवासी मुकेश उर्फ विजय रमेश भंगाळे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. पोलिसांना सुसाइड नोट सापडली. पण, त्यात काय उल्लेख आहे? हे समोर आले नाही.


३१ जुलैला सकाळी १० वाजेच्या आधी मुकेशने आपल्या पत्नीला मोबाइलवर 'मी आत्महत्या करत आहे' असा मेसेज टाकला. यानंतर काही वेळाने राहत्या घराजवळील जुन्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. निंभोरा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आजूबाजूच्या परिसरात मुकेशचा शोध घेतला. मात्र, जुन्या घरातच त्याने गळफास घेतल्याचे नंतर आढळले. 

      यानंतर मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले.नंतर अंत्यविधी करण्यात आले. दरम्यान, त्याच्या मोबाइलसोबत पोलिसांना एक सुसाईडनोट मिळाली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली.त्यात नेमका काय उल्लेख आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही. याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभय ढाकणे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.