Contact Banner

सावदा : विद्यार्थ्यांमध्ये एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

AIDS awareness program among students of Savda completed


सावदा : विद्यार्थ्यांमध्ये एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

लेवा जगत न्यूज सावदा – श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व श्री नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या वतीने एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी समुपदेशक श्री. महेंद्र सुरवाडे व श्री. सुनील महाजन (ग्रामीण रुग्णालय, रावेर) यांनी विद्यालयाला भेट देऊन इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना एड्सबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समाजात वावरताना योग्य काळजी घेण्याची गरज, लैंगिक संबंधांच्या संदर्भात जागरूकता, तसेच एचआयव्हीचा संसर्ग कसा होतो आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी आवश्यक आहे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विशेषतः तरुण-तरुणींनी याविषयी सावधान राहून आरोग्यदायी जीवन जगावे, असा संदेश त्यांनी दिला.

या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. एस.एम. महाजन, श्री. बी.ए. तेली, श्री. राठोड, श्री. मनोज महाजन, सौ. भारती भंगाळे मॅडम, श्री. एस.बी. नागपूरे, श्री. एच.पी. महाजन हे उपस्थित होते.

👉 या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एड्सबाबत माहिती व जागरूकता वाढण्यास मदत झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.